*विश्वास नांगरे पाटील यांचे मोलाचे संदेश*_
_‘यशवंताचा सक्सेस पासवर्ड’ या पुण्यात झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूर विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सक्सेस मंत्र दिला. त्यात त्यांनी खालील मोलाचे सल्ले दिले._
▪ 0 तास हे टाईमपाससाठी असावेत.
▫ इंटरनेट, मोबाइलवर कन्स्ट्रक्टिव गोष्टी पाहा पण डिस्ट्रक्टिव गोष्टींसाठी 0 तास ठेवा.
▪ फक्त 1 तास दररोज व्यायामासाठी द्या.
▫ 2 सेट सूर्यनमस्कार दररोज घाला. दिवसभर यामुळे अलर्ट राहाल.
▪ दररोज 2 कप ग्रीन टी घ्या. यामुळे शरीरातील एक्सॉडिशन कमी होते. ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घ्या.
▫ तीन वेळा छोटे छोटे ब्रेक घ्या. शॉर्ट मेंटल ब्रेक अतिशय महत्वाचे आहेत. तसेच या वेळेत भरपूर पाणी प्या.
▪ स्मॉल ब्रेक फॉर फूड. थोड्या थोड्या वेळाने फळ घा. फार महागडे काही खाण्याची गरज नाही. पण आवर्जून वडा पाव, मिसळ पाव असे उघड्यावरचे तेलकट पदार्थ टाळा.
▫ दररोज सकाळी 6 वाजता उठा. कारण लवकर उठे तो लवकर निजे त्यास आरोग्य लाभे असे त्यांनी सांगितले.
▪ दररोज 7 मिनिटे फक्त हसा. खूप हसा कारण हसल्यामुळे माईंड फ्रेश राहते.
▫ तुमच्या कामासाठी दररोज कमीत कमी 8 तास द्या. मग ते काम असो वा अभ्यास. पण 8 तास त्यासाठी वेगळे ठेवा.
visit our jokes website : https://www.jokesinmarathi.in/
▪ दररोज 9 मिनिटे मेडिटेशन करा. जेणे करून लक्षकेंद्रीत व्हायला अधिक मदत होईल.
▫ शिस्त लावून घ्या.
▪ भरपूर मेहनत करा.
👌 _*हे मोलाचे सल्ले आत्मसात केल्यास यशाचे शिखर नक्कीच दूर नसेल*_
nice post thank you
Awesome. Thanks for the Info