माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा- कुसुमाग्रज

माझ्या मराठी मातीचा,Mazya Marathi Maticha,माझ्या मराठी मातीचा,माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा,माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा गाणं
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दरयाखोर्यांतील शिळा.

हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात,
ज्यांच्या दुर्दम धीराने,
केली मृत्यूवरी मात.

नाही पसरला कर,
कधी मागायास दान,
स्वर्णसिंहासनापुढे,
कधी लवली ना मान.

 


हिच्या गगनात घुमे,
आद्य स्वातंत्र्याची द्वाही,
हिच्या पुत्रांच्या बाहूत,
आहे समतेची ग्वाही.

माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगे जागतील,
मायदेशातील शिळा.

-कुसुमाग्रज

ह्या पोस्ट माझ्या मराठी मातीचा – कुसुमाग्रज,माझ्या मराठी मातीचा,Mazya Marathi Maticha,माझ्या मराठी मातीचा,माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा,माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा गाणं,माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा कविता,माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा सोंग केल्या आहेत तुम्ही हे तुमच्या नातेवाईकाना whatsapp,facebook,instagram आणि sharechat ,Telegram वरून शेअर किंवा फिरवोर्ड करा..

Leave a Comment