100+ {best} marathi ukhane for male and female | lagnache ukhane | marathi life

ukhane for groom | ukhane for bride | zee marathi serial ukhane|marathi ukhane for girlfriend | marathi ukhane for boyfriend | navriche navryache ukhane

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});




१) नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला
—– रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला

2) निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे
लग्नाच्या दिवशी —– स वाटे —– रावांचे नाव घ्यावे

3) श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान
—– रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा मान

4) कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
—– रावांचे नाव घेते माझ्या मनात

5)  संथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती
—– रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती

6)  जीवनात ही घडी अशीच राहू दे
—– रावांचे प्रीतफुल असेच हसु दे

7)  शरदाचे चांदणे, मधुवनी फुले निशी़गंध
—– रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद

8)  आला श्रावणमास, पाऊस पडला शेतात
—– रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात

9)  अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा
—–रावांच्या नावावर भरते लग्नचुडा

10) दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र
—– रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र

11) वरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर
—– रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर

12) सोन्याची घुंगरं, चांदीच्या वाळ्या
सोनार घडवी दागिने —– रावांच्या बाळाला

13) गोकुळात आला क्रुष्ण, सर्वांना झाला हर्ष
—– रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष

14) गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज
—– रावांच्या बाळाची आज आहे मौंज

15) फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे
—– रावांच्या बाळाचे आज आहे बारसे

16) संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल
—– रावांना लागली बाळाची चाहूल

17) मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा
—– रावांच्या संसारात लावीन दिप नवा

18) सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा
—– रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा

19) थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले
—– रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले

20) दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती
—– रावांना ओवाळते मंगल आरती

21) मंगळागौरी माते नमन करते तुला
—– रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला

22) मोत्याची माळ, सोन्याचा साज
—– रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज

23)   —– रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
    आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन

24) आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
—– रावांचा सहवास जन्मभर लाभावा

25) उंबरठयावरचं माप पायांनी लोटते
—– रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते

26) नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर
—– रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर

27) चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल
—– रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल

28) मंगळागौरीची पूजा मनोभावे करते
—– रावांसाठी दीर्घायुष्य मागते

29) रंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते
लाडूचा गोड घास —– रावांना देते

30) चांदीच्या ताटात पक्वानांची रास
—– रावांना देते लाडूचा घास

31) प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी
जीवनाचे पूष्प वाहिले —– रावांच्या चरणी

32) मनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहर
—– रावांचा सहवास लाभो जन्मभर

33) सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी
—– राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी

34) आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
—– राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा

35)     आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याचा प्रवास करीन —– रावांच्या बरोबर

36)    लाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा
—– रावांसाठी जीव झाला माझा वेडा

37)   सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
—– रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह

38) आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस
—–राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस

39) संसार सागरात प्रीतीच्या लाटा
—– रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटा

40) पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून
—– राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन

41) साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज
—– रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साज

42) फुलात फुल जाईचे फुल
—– रावांनी घातली मला भूल

43) इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर
—- रावांचे नाव घेते सोडा माझा पदर

44) खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड
—– रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड

45) इग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून
—– रावांचे नाव घेते —– ची सून

46) सांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला
—– रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला

47) नीलवर्ण आकाशात चमकतात तारे
—– रावांचे नाव घेते लक्ष दया सारे

48) आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे
—– रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे

49) मंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार
—– रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकार

50) अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य
—– रावांचा आनंद हेच माझे सौख्य

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); 51) सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
—– रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले

52) घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस
—– रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळस

53) पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप
—– रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज

54) सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास
—– रावांना देते मी जिलेबीचा घास

55) चंद्राचा उदय, समुद्राला भरती
—– रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती

56) चंदनाच्या झाडावर बसला मोर
—– रावांच्या जीवावर मी आहे थोर

57) नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण
—– रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण

58) शब्द तिथे नाद कवी तिथे कविता
—– रावांची जोड जणू सागर आणि सरिता

59) नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
    आजपासून मी झाले —– रावांची ग्रुहमंत्री

60)अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली
—– रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली

61) सुखी संसारात हवी विश्वासाची जोड
—– रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड

62) नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा
—– रावांचे नाव असते ओठांवर, पण प्रश्न असतो उखाण्याचा

63) संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर
आयुष्याचा प्रवास करते —— रावांबरोबर

64) लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने
—– रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने

65) संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान
—– रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान

66) लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी
—– रावांचे नाव घेते तुमच्यासाठी

67) माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन
—– रावांच्या संसारात मन घेते वळून

68) कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले
—– रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले

69) आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण
—– रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण

70) शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान
—– रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान

71) जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले
—– रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले

72) भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
—– रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची

73) सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात
—– रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट

74) हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
—– रावांच्या जीवनात आहे मला गोडी

75) मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार
—– रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार

76) नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा
—– रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा

77) रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा
—–रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा

78) स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी
—– रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी

79 )संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
—– रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा

80) सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी
—– रावांचे नाव घेते —— च्यावेळी

81) गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद
—– रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात

82) पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात
     —– रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात

83) मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
     —– रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती

84) सत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार
    यज्ञ देवतांचा आधार —– राव माझे आधार

85) पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती
    —– रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती

86) आकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश
    —– रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश

87) माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
    त्यातच एकरुप —– रावांचे सूख निर्झर

88) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
    —– रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

89) सासरचे निराजंन माहेरची फुलवात
    —– रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात

90) सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण
    —– रावांचे नाव घेते ऐका सारेजण

91) सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी
    —– रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी

92) आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
    —– रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी

93) मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
    —– रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्स

94) आंनदाने भरला दिन हा लग्नाचा
    —– रावांना घास देते गोड जिलेबीचा

95) महादेवाला बेल,विष्णूला तूळ्स
    —— रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); 96) शिंपल्यात सापडले माणिक मोती
    —— रावांच्या जीवनात झाले मी सारथी

97) हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
    —— रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी

98) सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
    ———- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई

99) पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
   ———- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते

100 ) नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
   ——— च्या घराण्यात ———- रावांची झाले मी राणी

101) रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन
   ———-  रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन
———————————————————————–

Tags: marathi ukhane chavat,marathi ukhane video ,zee marathi serial ukhane ,ukhane for groom, ukhane for bride,shivaji maharaj ukhane,marathi ukhane photo

share all this post on  whatsapp,facebook,instagram and sharechat ,Telegram with your relatives,friends,family.. 
thanks for visit marathi life


Leave a Comment