🛰 _*इस्रो अंतराळ मोहिमांना देणार गती…*_

⚡ इस्रो सात महिन्यात 19 अभियान राबवणार, त्यात 10 सॅटेलाईटच्या प्रक्षेपणासह 9 यान प्रक्षेपित करण्यात येणार, इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांची माहिती…

👉 एवढ्या कमी वेळात इस्रो पहिल्यांदा मोठ्या संख्येने उपग्रह प्रक्षेपित करणार…

💁‍♂ _*सप्टेंबर ते मार्च या 7 महिन्यात राबवण्यात येणाऱ्या मोहिमा खालीलप्रमाणे :*_

▪ पीएसएलव्ही सी 42 च्या प्रक्षेपणाने 15 सप्टेंबरपासून या मोहिमेची सुरुवात होणार…

▪ ऑक्टोबर महिन्यात बाहुबली नावाने जीएसएलव्ही एमके 3- डी 2 या चार टनचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेल्या रॉकेटचे तसेच पीएसएलव्ही सी 43 याचेही प्रक्षेपण होणार

▪ हवाई दलासाठी महत्वाच्या असलेल्या जी सॅट 7 ओ आणि जी सॅट 11 या उपग्रहांचे नोव्हेंबरमध्ये प्रक्षेपण करण्यात येणार

▪ डिसेंबरमध्ये पीएसएलव्ही सी 44 आणि जीसॅट 31 अंतराळात सोडण्यात येणार…

▪ बहुप्रतीक्षीत चांद्रयान 2 मोहीम 3 ते 16 जानेवारीदरम्यान सुरू होणार, त्याच महिन्यात इस्रो पीएसएलव्ही सी 45 द्वारे रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट रिसॅट 2 बी अंतराळात सोडण्यात येणार…

▪ फेब्रुवारीमध्ये पीएसएलव्ही सी 46 द्वारे दोन उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार…

▪ मार्च महिन्यात रिसॅट 2 बीआर1, रिसॅट 2 बी यासह दोन इतर उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार…

Leave a Comment