लवकरच फेसबुक युजर्सना ‘डाऊनवोट’ (Downvote) नावाचे बटण मिळणार आहे. या बटणाची सध्या चाचणी केली जात आहे. अमेरिकेतले युजर्स पब्लिक पेजच्या पोस्टवरील कॉमेंट्ससाठी ‘डाऊनवोट’ हा पर्याय निवडत आहेत. टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार, हे नवे फीचर फेसबुकला आक्षेपार्ह, गैरसमज पसरवणाऱ्या आणि विषयाचा संदर्भ सोडून केलेल्या प्रतिक्रियांबाबत सावध करेल.