सौभाग्यवती भव – संकर्षण कऱ्हाडे


कुठून कसं देव जाणे

अनुरूप स्थळ आलं

विदर्भ कन्येचं मराठवाड्याच्या

या पोराशी लगीन झालं


मी बोलका ती अबोल

अशी आमुची एकही

सवय जुळत नाही


कुठून कसं देव जाणे

अनुरूप स्थळ आलं

विदर्भ कन्येचं मराठवाड्याच्या

या पोराशी लगीन झालं


मी बोलका ती अबोल

अशी आमुची एकही

सवय जुळत नाही


छोट्या गोष्टीवरून कोमेजणारी

तिची खुलता कळी खुलत नाही


कोमेजायला कळी तिची

कारणही काही लागत नाही

बिचारी बायको माझ्याकडे

वेळेशिवाय काही मागत नाही


पण एकदा हसली की

हसू तिचं पानावरच दव आहे

आईशपथ हाताला तिच्या

अमृता समान चव आहे


पण खरं सांगतो

तू माझी आहेस

अजून काय हवं


खूप प्रेम आणि आशीर्वाद तुला

अखंड सौभाग्यवती भव

– संकर्षण कऱ्हाडे

Leave a Comment