🤔 *दररोज केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर केल्याने काय नुकसान ?*
▪ जास्त शॅम्पूचा वापर केल्याने केसांच्या मुळांपाशी किंवा स्काल्पला असलेले आवश्यक तेलही निघून जाते.
▪ नॅचरल ऑइलच्या कमतरतेमुळे स्काल्पची त्वचा सुकून जाते आणि केसांच आरोग्य बिघडतं.
▪ केस गळण्याचे प्रमाण वाढते.
▪ शॅम्पूचा जास्त वापर केल्याने स्काल्पसोबत केसांमधील नॅचरल ऑईलही कमी होऊ लागतं. ज्यामुळे केसांची नॅचरल शाइन कमी होते.
🤔 *केसांना रोज शॅम्पू केल्याने काय फायदा ?*
▪ ज्यांच्या केस फार ऑयली असतात त्यांना दररोज शॅम्पू केल्याने फायदा होतो.
▪ ज्या लोकांच्या स्काल्पची त्वचा गरजेपेक्षा अधिक ऑयली आहे तेदेखील दररोज शॅम्पू करू शकतात.
▪ जे लोक अधिक शारीरीक परिश्रमाची कामं करतात. तसेच कामासाठी दिवसबर बाहेर फिरतात त्यांना गरजेपेक्षा अधिक घाम येतो. अशा लोकांनीदेखील दररोज शॅम्पूने केस धुणं फायदेशीर ठरतं.