विश्वास नांगरे पाटील यांचे मोलाचे संदेश

👍 _*विश्वास नांगरे पाटील यांचे मोलाचे संदेश*_

_‘यशवंताचा सक्सेस पासवर्ड’ या पुण्यात झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूर विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सक्सेस मंत्र दिला.  त्यात त्यांनी खालील मोलाचे सल्ले दिले._

▪ 0 तास हे टाईमपाससाठी असावेत.

▫ इंटरनेट, मोबाइलवर कन्स्ट्रक्टिव गोष्टी पाहा पण डिस्ट्रक्टिव गोष्टींसाठी 0 तास ठेवा.

▪ फक्त 1 तास दररोज व्यायामासाठी द्या.

▫ 2 सेट सूर्यनमस्कार दररोज घाला. दिवसभर यामुळे अलर्ट राहाल.

▪ दररोज 2 कप ग्रीन टी घ्या. यामुळे शरीरातील एक्सॉडिशन कमी होते. ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घ्या.

▫ तीन वेळा छोटे छोटे ब्रेक घ्या. शॉर्ट मेंटल ब्रेक अतिशय महत्वाचे आहेत. तसेच या वेळेत भरपूर पाणी प्या.

▪ स्मॉल ब्रेक फॉर फूड. थोड्या थोड्या वेळाने फळ घा. फार महागडे काही खाण्याची गरज नाही. पण आवर्जून वडा पाव, मिसळ पाव असे उघड्यावरचे तेलकट पदार्थ टाळा.

▫ दररोज सकाळी 6 वाजता उठा. कारण लवकर उठे तो लवकर निजे त्यास आरोग्य लाभे असे त्यांनी सांगितले.

▪ दररोज 7 मिनिटे फक्त हसा. खूप हसा कारण हसल्यामुळे माईंड फ्रेश राहते.

▫ तुमच्या कामासाठी दररोज कमीत कमी 8 तास द्या. मग ते काम असो वा अभ्यास. पण 8 तास त्यासाठी वेगळे ठेवा.

▪ दररोज 9 मिनिटे मेडिटेशन करा. जेणे करून लक्षकेंद्रीत व्हायला अधिक मदत होईल.

▫ शिस्त लावून घ्या.

▪ भरपूर मेहनत करा.

👌 _*हे मोलाचे सल्ले आत्मसात केल्यास यशाचे शिखर नक्कीच दूर नसेल*_

3 thoughts on “विश्वास नांगरे पाटील यांचे मोलाचे संदेश”

Leave a Comment