येणाऱ्या पिढ्यांना आपण कोणते आदर्श दाखवणार?

येणाऱ्या पिढ्यांना आपण कोणते आदर्श दाखवणार? तुमची मोनो की मेट्रो? भविष्यात इतरांना तुम्ही गडकोट काय फक्त चित्रात दाखवून हॉटेलातील पार्ट्यांमध्ये फिरवणार का? आपल्या बापजाद्यांनी रक्ताचा सडा शिंपून राखलेले गडकोट महाराष्ट्रातील असंख्य तरुणांचे आजही प्रेरणास्थान आहेत आणि उद्याही राहतील. 

इथल्या गडकोटांची ताकद कळाली ती त्या फक्त औरंगजेब आणि त्यानंतर फक्त इंग्रजांना म्हणून सर्वांत आदी त्यांनी गडकोटांवर आपल्या दारू कोठारातील स्फोटक दारू रीती केली तिथं तुम्ही पार्ट्या आणि लग्न समारंभ करून तुमच्या दारू घशात रिजवणार का? .

सत्ता आणि सौंदर्य चिरकाल टिकत नाही. तर आई बाप म्हातारे झाले म्हणून त्यांना घराबाहेर काढायची इथल्या मातीची संस्कृती नाही. असतील चार भिंती वा असतील त्यात वाढलेल्या यड्या बाभळी, झुडपे त्या आजही इमानेइतवारे ह्या मातीशी आणि इथल्या ज्वाजल्य इतिहासाशी एकरूप आहेत. 

laibharimanus
चार पैशाच्या हव्यासापोटी तुमच्यासारख्या हरामखोर आणि स्वार्थी व्यावसायिकांसारख्या लाचार आणि लालची नाहीत. सत्तेच्या आडून आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ न कळायला काय तुम्ही कडक गांजा ओढलाय की काय? सरकारला भिकेचे डोहाळे लागले असतील तर त्यांनी आपल्या पुढाऱ्यांच्या किडन्या काढून विकाव्यात आम्ही विकत घेऊ आणि पैसा उभा करू. आमचा भूगोल आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न येत्या काळात हजारो संस्था आणि संघटनां मार्फत मोठ्या आंदोलनाने हाणून पाडला जाईल.

औरंगजेबाने सुद्धा केला की ओ नाद महाराष्ट्रातील गडकोटांचा, इतिहास साक्षी आहे. त्याची जिद्द जिरवली ती ह्याच मातीने. इथल्या भूमीपुत्रांनी आलमगीरला भिंगार गावात इथल्या गडकोटांच्या नादापाई कायमचे झोपवले. हा दगड मातीचा सह्याद्री बंडखोरांना फूस लावतो असं औरंगजेब म्हणायचा. तर तुमची ती बिशाद काय? 


शब्दांचे खेळ करणाऱ्या नालायकांनो याद राखा इथले गडकोट आजवर इथल्या असंख्य तरुणांनी आपल्या रक्ताचे पाणी करून आईप्रमाणे सांभाळले आहेत. आज जरी ते आजारी असतील म्हणून तुम्ही तिच्या पदराला हात घालाल तर तुमची गत शास्ता खानासारखी व्हायला वेळ लागणार नाही. .Credit :- @laibharimanus

Leave a Comment