मावळतीला -वि. स. खांडेकर

v s khandekar books pdf,prasad khandekar,vi sa khandekar information in marathi,v s khandekar books in marathi,v s khandekar books pdf free download in marathi,h j khandekar in marathi,vs khandekar quotes
v s khandekar-मावळतीला  -वि. स. खांडेकर

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले

जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जिवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले.

घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणि मजला घेरित आले.

मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे
एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे
सुखदुःखाच्या मधली विरता सीमारेषा
गाठ काळजातली अचानक सुटते आहे.

जाणिव विरते तरिही उरते अतीत काही
तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही
आतुरवाणी धडधड दाबुन ह्रदयामधली
श्वास आवरून मन कसलीशी चाहुल घेई.

हलके हलके उतरत जाते श्वासांची लय
आता नसते भय कसले वा कसला संशय
सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा
मी माझ्यातुन सुटते, होते पूर्ण निराशय.


-वि. स. खांडेकरवि स खांडेकर यांचा एक रूपक कथा संग्रह,वि स खांडेकर यांनी कोणत्या वादाचे समर्थन केले,संगीत शाकुंतल हे किती अंकी नाटक आहे,कोरडी भिक्षा या ललित लेखाचे लेखक कोण आहेत,पु ल देशपांडे यांची नाटके,v s khandekar books pdf,prasad khandekar,vi sa khandekar information in marathi,v s khandekar books in marathi,v s khandekar books pdf free download in marathi,h j khandekar in marathi,vs khandekar quotes.

Leave a Comment