महाशिवरात्र-mahashivratri

celebrate mahashivratri at home,mahashivratri 2021 india,isha mahashivratri 2021,isha mahashivratri 2021 registration,mahashivratri 2020,mahashivratri images,mahashivratri story,mahashivratri 2021,mahashivratri meditation,mahashivratri 2021 india
महाशिवरात्र
शिवरात्री वर्षभरातील प्रत्येक महिन्यात येत असते, परंतु, माघ महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शैव पंथीय उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस बहुधा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.
महाशिवरात्र
महाशिवरात्रीच्या दिवशी हे घोंगलाचे फूल शिवाला वाहण्याची विदर्भात पद्धत आहे.

महाशिवरात्र
हे कल्याणकारी शिवाचे आ राधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे.
महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिवमंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्‍याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात.
महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे.हे व्रत नैमित्तिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे आहे असे मानले जाते. शिवरात्रीच्या रात्री चार पूजा करावया असा संकेत आहे त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात.
या द‍िनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याची दुसर्‍या दिवशी सकाळी समाप्‍ती होतो. दुसर्‍या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.
महाशिवरात्रीचे व्रत कुमारिका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात असे मानले जाते. शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्‍त होतो अशी श्रद्धा आहे.
काटेधोत्र्याचे फळ – महाशिवरात्रीच्या दिवशी हे फळ शिवाला वाहतात.

भारतात अनेल शिवमंदिरे असून शिवरात्रीला ठिकठिकाणी अशा मंदिरात यात्रा भारतात.
अन्य कोणतेही उपास न पाळाणारे हिंदू पुरुष आश्विनी आणि कार्तिकी या दोन एकादशांना आणि महाशिवरात्रीला उपवास करतात.
महाशिवरात्रीच्या दिवशी भरणार्‍या महाराष्ट्रातील यात्रा

·         औंढा नागनाथ येथील यात्रा
·         देवगडजवळचे कुणकेश्वरची यात्रा
·         ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा रेल्वे स्टेशनानजीकचे गंगा गोरजेश्वर देवस्थान परिसरातील यात्रा
·         राजापूर शहरानजीक असलेल्या मौजे धोपेश्वर गावातील धूतपापेश्वर देवस्थानाच्या परिसरात
·         सातारा जिल्ह्यातील लिंब गोवे येथील कोटेश्‍वर मंदिराच्या परिसरात
·         भीमाशंकरची यात्रा
·         चामोर्शी तालुक्‍यातील मार्कंडादेव येथील मार्कंडेश्‍वर मंदिर परिसरातील यात्रा
·         आष्टीनजीकच्या चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांतधाम परिसरातील यात्रा
·         वैरागडचे भंडारेश्‍वर मंदिर परिसरातील यात्रा
·         आरमोरी तालुक्याच्या मुख्यालयाजवळच्या पहाडीवरील महादेवगड मंदिर
·         शिवणी-डोंगरगावजवळील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्‍याच्या आवळगाव येथील सुप्रसिद्ध गुरुबाबा देवस्थान परिसरातील यात्रा
·         गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्‍यातील खोब्रामेंढा येथील मंदिर परिसरातील यात्रा
·         गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील मंदिर परिसरातील यात्रा
·         कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी येथील यात्रा
·         घारापुरी लेण्यांजवळ (मुंबई) येथील यात्रा
·         पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात असलेल्या नागनाथ मंदिर परिसरात. हे गाव वाडा तालुक्यातील खनिवलीपासून दोन कि.मी.अंतरावर आहे.
·         खडकेश्वर, (औरंगाबाद)
·         औरंगाबादपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या वेरूळ लेण्यांच्या जवळचे गरुडेश्वर मंदिर येथे.
·         परळी वैजनाथबीड जिल्हा
·         घृष्णेश्वर, दौलताबाद-मराठवाडा
·         गडचांदूर (चंद्रपूर जिल्हा)
·         सांगली जिल्हा कवठे महांकाल येथे
·         श्री अगस्ती मंदिर, ता: अकोले, जी: अहमदनगर
महाशिवरात्रि निबंध मराठी,महाशिवरात्रि कथा मराठी,महाशिवरात्री ची कथा मराठी,महाशिवरात्री शुभेच्छा,महाशिवरात्री माहिती,महाशिवरात्रीचे महत्व सांगा,महाशिवरात्रि किती तारखेला आहे, महाशिवरात्रि निबंध मराठी,महाशिवरात्रि कथा मराठी,महाशिवरात्री ची कथा मराठी,महाशिवरात्री शुभेच्छा,महाशिवरात्री माहिती,महाशिवरात्रीचे महत्व सांगा,mahashivratri 2020,mahashivratri story,mahashivratri 2021,maha shivaratri benefits,how to celebrate mahashivratri at home,mahashivratri 2021 india,isha mahashivratri 2021,isha mahashivratri 2021 registration

Leave a Comment