भेट तुझीमाझी स्मरते – मंगेश पाडगावकर

mangesh padgaonkar kavita sangrah list,मंगेश पाडगावकर प्रेम कविता संग्रह,मंगेश पाडगावकर कविता संग्रह,मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रह,मंगेश पाडगावकर 
भेट तुझीमाझी स्मरते - मंगेश पाडगावकर
भेट तुझीमाझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची


कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची


क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची


केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची


सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्‍नातच स्वप्‍न दिसावे तसे सर्व भास
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

– मंगेश पाडगावकर

ह्या पोस्ट mangesh padgaonkar kavita sangrah list मंगेश पाडगावकर प्रेम कविता संग्रह,मंगेश पाडगावकर कविता संग्रह,मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रह,मंगेश पाडगावकर यांची मी फुल तृणातील इवले ही कविता,mangesh padgaonkar kavita pdf download,bharat wikipedia in marathi,mangesh padgaonkar kavita ayushya,mangesh padgaonkar kavita sangrah list,मंगेश पाडगावकर कविता संग्रह,bharat wikipedia in marathi केल्या आहेत तुम्ही हे तुमच्या नातेवाईकाना whatsapp,facebook,instagram आणि sharechat ,Telegram वरून शेअर किंवा फिरवोर्ड करा..

Leave a Comment