भिजवलेले बदाम का खावेत ?

भिजवलेले बदाम

भिजवलेले बदाम का खावेत ?

बदामामध्ये व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवणे फार गरजेचे आहे. बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही एन्जाईम्समुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच त्यांना रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषणता मिळण्यास मदत होते.

👉 भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

▪ गर्भाची योग्यरित्या वाढ होण्यास मदत होते
गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील फार आरोग्यदायी आहेत. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ  करण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर  स्त्रियांना सहज पचायला शक्य असतात.

▪ पचनशक्ती सुधारण्यास मदत करते
भिजवलेल्या  बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

▪ रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते.

▪ हृद्याचे कार्य सुधारते
बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो.

▪ शरीरातील ‘बॅड कोलेस्ट्रेरॉल’ वर नियंत्रण ठेवते
बदामांमुळे शरीरातील ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्टेरॉल वाढते.

▪ वजन घटवण्यास मदत होते
बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

Leave a Comment