बिनभिंतीची शाळा -ग. दी. माडगुळकर

बिनभिंतीची उघडी शाळा

लाखो इथले गुरु,
झाडे, वेली, पशु, पाखरे
यांशी गोष्टी करू.
बघू बंगला या मुंग्यांचा,
सूर ऐकुया त्या भुंग्यांचा.
फुलाफुलांचे रंग दाखवित
फिरते फुलपाखरू
हिंडू ओढे, धुंडू ओहळ,
झाडावरचे काढू मोहळ
चिडत्या, डसत्या मधमाश्यांशी
जरा सामना करू
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,
ऐन दुपारी पर्ह्यात पोहू.
सायंकाळी मोजु चांदण्या
गणती त्यांची करू.
. दी. माडगुळकर

Leave a Comment