प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन…

अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत पहाटे 5 वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.


पहिली सुपरस्टार अभिनेत्री


श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलं जातं. श्री अम्मा यंगर अय्यपन म्हणजेच श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे.

वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी थुनैवन या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात केली. 1971 मध्ये वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी त्यांना पुम्बाता या मल्ल्याळम चित्रपटासाठी केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

1975 मध्ये ज्युली या बॉलिवूडपटातून श्रीदेवींनी बालकलाकार म्हणून पदार्पण केलंत्या चित्रपटात नायिका लक्ष्मीच्या धाकट्या बहिणीची भूमिका श्रीदेवी यांनी रंगवली होती.

वयाच्या 13 व्या वर्षी मूंद्रू मुदिचू (1976) हा श्रीदेवींनी केलेला तामिळ चित्रपट प्रौढ कलाकार म्हणून पहिला सिनेमा मानला जातो. 1979 मध्ये प्रदर्शित झालेला सोलवा सावन हा श्रीदेवी यांचा पहिला बॉलिवूडपट ठरला.

हिम्मतवाला, सदमामुळे यशोशिखरावर :-

श्रीदेवी यांच्या नावाचा खरा गवगवा झाला तो 1983 साली प्रदर्शित झालेल्या हिम्मतवाला चित्रपटानं. जीतेंद्र आणि श्रीदेवी या जोडीनं मग मवालीमकसदजस्टिस चौधरी असे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले.

1997 साली केलेल्या जुदाई चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी जवळपास 15 वर्षांचा मोठा ब्रेक घेतला. 


15 वर्षांनी पुनरागमन:-
2012 मध्ये गौरी शिंदे दिग्दर्शित इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून श्रीदेवींनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. या चित्रपटातून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. 2017 मध्ये प्रदर्शित झालेलामॉमहा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

गाजलेले चित्रपट

1983- सदमा

1983- हिम्मतवाला

1983- जस्टिस चौधरी

1983- मवाली

1983- कलाकार

1984- तोहफा

1986- नगिना

1986- आग और शोला

1986- कर्मा

1986- सुहागन

1987 – औलाद

1987 – मिस्टर इंडिया

1989 – निगाहे (नगिना भाग 2)

1989 – चांदनी

1989 – चालबाज (
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1991 – फरिश्ते

1991 – लम्हे (
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1992 – खुदा गवाह

1992 – हीर रांझा

1993 – रुप की रानी चोरों का राजा

1993 – गुमराह

1993 – चंद्रमुखी

1994 – लाडला

1997 – जुदाई


2004 – सहारा वन चॅनलवर मालिनी अय्यर या दैनंदिन मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री


2012 – इंग्लिश विंग्लिश

2017 – मॉम

Leave a Comment