नाहीं निर्मळ जीवन – संत तुकाराम


नाहीं निर्मळ जीवन काय करील साबण ॥धृ०॥
तैसें चित्त शुद्ध नाहीं तेथें बोध करील काई ॥१॥
वृक्ष धरी पुष्पफळ काय करील वसंतकाळ ॥२॥
वांजे होती लेकरें काय करावें भ्रतारें ॥३॥
नपुंसका पुरुषासी काय करील बाइल त्यासी ॥४॥
प्राण गेलिया शरीर काय करील वेव्हार ॥५॥

तुका ह्मणे जीवनेंविण पीक नव्हे नव्हे जाण ॥६॥


– संत तुकाराम

Leave a Comment