देशातील सर्वात मोठी 25 लाखांची दहीहंडी ठाण्यात; मुख्यमंत्री, मंत्र्यांसह अनेक कलाकारही लावणार हजेरी…

देशातील सर्वात मोठी 25 लाखांची दहीहंडी ठाण्यात; मुख्यमंत्री, मंत्र्यांसह अनेक कलाकारही लावणार हजेरी…

मुंबई- दहीहंडीचे जास्तीत जास्त थर लावण्यासाठी दहीहंडी मंडळाना प्रेरित करावे म्हणून लाखोंची बक्षिसे मुंबई आणि ठाण्यात लावली जातात. या लाखांच्या संख्येने आता 25 लाखांचा आकडा गाठला असून ठाणे येथे स्वामी प्रतिष्ठानने दहा थर लावणा-या मंडळाला 25 लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. तसेच पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दहीहंडीत खास उपस्थिती लावणार आहेत. त्यांच्यासोबतच अनेक कलाकारही या दहीहंडीसाठी येणार आहेत अशी माहिती भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघाचे अध्यक्ष व स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिली. यावेळी केरळमधील पुरग्रस्तांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लाखो रुपयांचा निधीही मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे.

3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ठाणे येथील हिरानंदानी मिडोज चौक, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्ययगृहासमोर स्वामी प्रतिष्ठानतर्फे पहिल्यांदा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. दहा थर लावणाऱ्या गोविदा पथकाला 25 लाख तर 9 थर लावल्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. महिलांसाठी आणि ठाणेकर गोविदा पथकासाठी स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनय सहस्रबुद्धे, खासदार कपिल पाटील, भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, सल्लागार तथा मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक, आमदार नरेंद्र पवार, आमदार प्रसाद लाड, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश चौगुले, आमदार नरेंद्र मेहता, आमदार प्रवीण दरेकर, आमदार रमेश पाटील, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा माधवी नाईक, भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

तसेत मराठी चित्रपट सृष्टीतील सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, रुपाली भोसले, मिरा जोशी, केतकी चितळे, राधा कुलकर्णी, स्मिता शेवाळे, सिया पाटील, मधुरा देशपांडे, प्रिती सदाफुले आणि माधवी निमकर हे कलाकार तसेच अभिजीत कोसंबी आणि इतर चार गायक कलाकार हे आपली कला सादर करणार आहेत. जोडीला जव्हार येथील आदिवासीचा तारफा नुत्य हे आणखीन एक आकर्षण ठरणार आहे.

Leave a Comment