दहावीचा निकाल 8 किंवा 11 जूनला लागण्याची शक्यता……

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल येत्या दोन ते चार दिवसांनी लागणार असल्याचे संकेत आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार दहावीचा निकाल तयार असून तो शुक्रवार 8 जून किंवा सोमवार 11 जून यापैकी कुठल्याही दिवशी लागू शकतो. शिक्षण मंडळानं अधिकृतरीत्या याबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही. परंतु मंडळाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रसारमाध्यमांशी बोलताना 8 जून किंवा 11 जून रोजी निकाल जाहीर होऊ शकतो असे संकेत दिले आहेत.

▪ सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील.
 कुठे पाहाल निकाल?

http://mahresult.nic.in/   या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल.

जरी अधिकृतरीत्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी निकाल तयार असून तो 8 किंवा 11 जून रोजी लागण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी याची दखल घ्यावी असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment