‘चला हवा येऊ द्या’ फेम विनीत बोंडेचा साखरपुडा

झी मराठी वाहिनीवरीलचला हवा येऊ द्याया कार्यक्रमामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता विनीत बोंडे लवकर विवाहबंधनात अडकणार आहे. मूळ औरंगाबादचा असलेल्या विनीतचा साखरपुडा त्याच्या घरी पार पडला.

येत्या 4 मार्च रोजी औरंगाबादमध्येच विनीत बोहल्यावर चढणार आहे. विनीतची होणारी बायको सोनम पवार मूळ सोलापूरची आहे. नर्सिंगच्या प्रशिक्षणानिमित्त ती सध्या पुण्यात राहते. विनीतच्या साखरपुड्याला मोजक्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती.

कधी लहान मुलगा, कधी पोलिस हवालदार तर कधी बाई, अशा वेगवेगळ्या रुपांमध्ये विनीतचला हवा येऊ द्याच्या एपिसोड्समध्ये झळकला होता. त्यानंतर तो फारसा दिसला नाही,

विनीतची भूमिका असलेले शहाणपण देगा देवा, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा यासारखे चित्रपट गाजले आहेत.

Leave a Comment