गुगलचे आधीचे नाव माहित आहे का ?

गुगलचे आधीचे नाव माहित आहे का ?

🔍 आपल्याला इंटरनेटवर काहीही शोधायचे असेल तर गुगल हे पाहिलं सर्च इंजिन आपल्या डोळ्यासमोर येतं. याचंच आधीच नाव काय आहे ? गुगल हे नाव कसं दिलं ? बघुयात…

1998 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या गुगलचे आधीचे नाव होते बॅकरब. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन या संशोधकांनी गुगलची निर्मिती केली. 4 सप्टेंबर रोजी टायटॅनिक जहाजाचे 73 सालापूर्वीचे फोटो सापडल्यामुळे गुगल पहिल्यांदा जगासमोर आले होते. शोधण्यात आलेली वेबसाईट किती महत्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी ते बॅक लिंक्स पद्धतीबरोबरच त्या साईटशी संबंधित इतर साईट्सचा वापर करत असत. त्यामुळे त्याचे नाव बॅकरब असे ठेवण्यात आले. बॅकरब हे जोपर्यंत कमी ब्रॅण्डविड्थ वापरत होते तोपर्यंत ते स्टॅण्डफर्डचाच सर्व्हर वापरत होते.

1997 मध्ये बॅकरब हे नाव तितकेसे चांगले नसल्याचे लक्षात आले. मग आहे ते नाव बदलून काय ठेवायचे यावर बऱ्याच चर्चा झाल्या आणि विचारही करण्यात आला. मग गणितातील एका संकल्पनेवरुन हे नाव ठेवण्यात आले. googol याचा अर्थ एकावर 100 शून्य असा होतो. म्हणजेच एक गोष्ट शोधल्यावर 100 गोष्टी सापडतील असे. मग याचेच पुढे Google झाले.

Leave a Comment