के. सिवन..कन्याकुमारी जवळ एका खेड्यात जन्मलेल्या या पोराला आज सगळे इस्रो (Isro chairperson … K. Sivan)चा अध्यक्ष म्हणुन ओळखतात

के. सिवन(K Sivan has No Personal Accounts)  (Isro chairperson K. Sivan)

कन्याकुमारी जवळ एका खेड्यात जन्मलेल्या या पोराला आज सगळे इस्रो चा अध्यक्ष म्हणुन ओळखतात पण यांनी अतिशय हालाखीच्या परिस्थिती मध्ये शिक्षण घेतल आहे वडिलांचा शेती हा व्यवसाय होता आणि ते पारंपरिक फक्त दोन टाईम जेवायला मिळाव अशी शेती करायचे.

लहानपणापासून सिवन हे अभ्यासात हुशार होते पण त्यांच्या भावाला वाटायचं हे शेतीचे काम नको म्हणून शाळेत जातो त्यावेळी सिवन धोतर आणि कुडता वापरायचे आणि बिना चप्पलच हिंडायचे.
काॅलेजमध्ये एडमिशन घेताना फिस भरायला पैसे नव्हते तर ते बाजारात जाऊन घरचे आंबे विकायचे आणि पैसे जमा करायचे नंतर मात्र त्यांना स्काॅलरशिप मिळाली आणि काही दानशुर लोकांमुळे त्यांचे हे भोग संपले आणि ते अभ्यास जोमाने करु लागले.

काॅलेज चालू असताना त्यांनी गणितात १०० मार्क मिळाले म्हणुन त्यांचा सत्कार झाला आणि मिळालेल्या पैशातून त्यांनी आयुष्यात प्रथमच चप्पल घेतली नंतर बी.टेक, एम,टेक करत एरोस्पेस इंजिनीअरिंग पुर्ण केली आणि ते वैज्ञानिक झाले.वाचायला या घटना अतिशय सोप्या वाटतात पण भोग भोगताना एक एक दिवस युगासारखा असतो आज ना उद्या चंद्रयान हा माणुस पाठवल्या शिवाय गप्प बसणार नाही हे सगळ्यांना चांगलच माहिती आहे कारण 

रात्रंदिवस मेहनत आणि काम इतकच यांना माहिती आहे आपल्या या भारतीय हिरो ची माहिती सगळीकडे जायलाच हवी…

Isro chairperson ... K. Sivan

Leave a Comment