केंद्रीय अर्थसंकल्प आज सकाळी 11 वाजता संसदेत मांडला जाणार आहे. केंद्र सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सरकार काय देणार? याकडे देशाचं लक्ष लागले आहे. त्यावर एक नजर…
* करमुक्त उत्पन्नाची सध्याची अडीच लाखांची मर्यादा तीन लाखावर जाण्याची शक्यता
* कलम 80 सी अंतर्गत येणाऱ्या करमुक्त गुंतवणूकीची मर्यादाही 50 हजारांनी वाढण्याची शक्यता
* ग्रामीण भागासाठी असलेल्या योजनांना जास्त निधीची तरतूद केली जाऊ शकते
* शेअर गुंतवणुकीतील लाभांशावर असलेली सूट आता बंद केली जाऊ शकते
* महसुलासोबतच रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी निधी दिला जाईल
* सोन्यावरील आयात शुल्क कमी होण्याची शक्यता, त्यामुळे सोनं 600 ते 1200 रूपयांनी स्वस्त होऊ शकतं