उरलेला गुलाब – चितस्थधि

उरलेला गुलाब – चितस्थधि, देण्याघेण्याच्या रिवाजापुरता उरलेला गुलाब,एका एका पाकळी आड लपलेली एक एक अनाम भावना,gulab rose,

उरलेला गुलाब - चितस्थधि

देण्याघेण्याच्या रिवाजापुरता उरलेला गुलाब,
एका एका पाकळी आड लपलेली एक एक अनाम भावना,
उलगडताना कोणी नावं बेचिराख करत निघालाय,
त्या काट्यांआड रुतलेली वनराई जाळीत निघालाय,
त्या धुराचा गंध धुंद करतो कित्येकांना…
आणि उरलेले उध्वस्त कोनाडे साफ करून लख्ख होतात,
पुन्हा एक गुलाब रुजण्याची,
जमीन बनून…

– चितस्थधि(सागर कुर्डे)
Art By – विजय हिबरे

Leave a Comment