‘आठवणीतील शाळा’….

आज कार्यक्रमाच्या निमित्ताने सहजच पावलं शाळेत वळली. तोच वर्गातूनएक साथ नमस्तेचा गलका ऐकू आला. पसायदानाने सुरु होणारा वर्ग सोबत वर्गातील तरहेवाईक पंचक्रोशितील बेनी जी आपल्या त्या सुखाच्या दिवसांचे सोबती होते.
माझी नजर सार्या वर्गात भिरभिरत होती. मित्रांच्या बसायच्या जागा न्याहाळत होती. आवाज करणारी खिळीखिळी बाकं त्यावर केलेली नावांची कलाकारी सर्व तसेच होते त्यात काही नावांची संख्या मात्र वाढली होती.

बाकावर हात फिरवताच सर्व मित्रांची नावं नव्याने बाजूला क्षणात गोळा झाली होती. तशी त्यांची वल्ली व्यक्तीरेखा आठवत होती. गुरुजी आणि बाई यांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. वर्गाचा फळा थोडा थकलेला वाटला मात्र तो समाधानी वाटत होता. बाजूला भिंतीवर असलेली समीकरणे, तक्ते आणि प्रमेय तशीच स्पष्ट होती. खिडकीतून वह्यांच्या पानांची विमाने आजही तशीच उड्डान घेतं होती. बापूंच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य कायम होते. शाळेत केलेल्या शाळा आणि ते सोनेरी दिवस भूतकाळात पुरेपुर घेऊन गेली होती.
तोच वर्गात मागून हाक मारलेला आवाज आला आणि सर्व वर्गाचा कानात सुरु असलेला गोंगाट एकदम बंद झाला तेव्हा आपली इयत्ता ह्या शाळेत आता कुठेच नाही ह्याची जाणीव झाली. तशी जड पावलं वर्गाच्या बाहेर घराकडं वळाली.

Leave a Comment