आज चंद्र पूर्ण लाल दिसणार; 152 वर्षांनंतर दुर्मिळ योग


 आज चंद्र पूर्ण लाल दिसणार; 152 वर्षांनंतर दुर्मिळ योग

खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून असा खास तिहेरी नजराणा आज आकाशात पाहायला मिळणार आहे. तब्बल 152 वर्षांनंतर हा दुर्मिळ योग येणार आहे. यापूर्वी असा तिहेरी योग 31 मार्च 1866 रोजी आला होता. इतकंच नाही तर आज चंद्र पूर्ण लाल दिसणार आहे. खगोल शास्त्रज्ञांनी याला ‘स्नो ब्ल्यु सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स’ असे नाव दिले आहे.

ब्ल्यु मून म्हणजे काय?


जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, या घटनेला ‘ब्ल्यु मून’ असे म्हटले जाते. 


सुपरमून म्हणजे काय?


चंद्र पृथ्वीच्या जवळ पोहोचलेला असताना आलेल्या पौर्णिमेला सुपरमून असे म्हटले जाते.

Leave a Comment