अवघ्या 117 दिवसात तीन पूल उभारले!

भारतीय सैन्यानं मुंबईत रेल्वे स्थानकांवर उभारलेल्या पादचारी पुलांचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस, रेल्वे मंत्री पियुष गोएल आणि डॉ. सुभाष भामरेच्या यांच्या हस्ते 27 फेब्रुवारीला करण्यात आलं
.

मुंबई उपनगरीय रेल्वेवरील आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टनपरळ यांना जोडणारे पादचारी पूल लष्कराने बांधले आहेत.

मुख्यमंत्री एल्फिन्स्टनला असताना व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे आंबिवली आणि करीरोड पुलांचं लोकार्पण करण्यात आलं.

एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेनंतर मुंबई रेल्वेवरील पादचारी पुलांचा प्रश्न समोर आला होता. त्यानंतर भारतीय सैन्यानं युद्धपातळीवर काम करत मुंबईतल्या गर्दीच्या ठिकाणी हे पादचारी पूल उभे केले.

Leave a Comment