अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी -मंगेश पाडगावकर

Akherche Yetil Majhya with lyrics, अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी,bhet tuzi mazi smarate ,आठवणीतील गाणी राग,mangesh-padgaonkar

मंगेश-पाडगावकर-mangesh-padgaonkar
अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती

इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती

सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती

मंगेश पाडगावकर

ह्या पोस्ट  Akherche Yetil Majhya with lyrics, अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी,bhet tuzi mazi smarate,आठवणीतील गाणी राग,mansa ithe mi tuze git gave,मंगेश पाडगावकर यांची गाणी,kasa karu shingar lyrics,tuze geet ganyasathi,tinhi lok anandane mp3 download,arundhati shukratara 

केल्या आहेत तुम्ही हे तुमच्या नातेवाईकाना whatsapp,facebook,instagram आणि sharechat ,Telegram वरून शेअर किंवा फिरवोर्ड करा..

Leave a Comment